PHOTO | देशभरात छटपूजा उत्साहात; ठिकठिकाणी सूर्यदेवाला नमन
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे कार्तिक महिन्याच्या सहाव्या दिवशी छटपूजा केली जाते. दिवाळीच्या चौथ्या दिवशी ही पूजा होते.

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे कार्तिक महिन्याच्या सहाव्या दिवशी छटपूजा केली जाते. दिवाळीच्या चौथ्या दिवशी ही पूजा होते.
- उत्तर भारतामध्ये छटपूजेला मोठे महत्त्व आहे. छटपूजा उत्तर भारतात एक उत्सव म्हणून साजरी केली जाते.
- हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे कार्तिक महिन्याच्या सहाव्या दिवशी छटपूजा केली जाते. दिवाळीच्या चौथ्या दिवशी ही पूजा होते.
- यावेळी सूर्यदेव आणि त्यांची पत्नी उषा यांचे आभार मानले जातात. त्यांचा आर्शीवाद घेण्यासाठी ही पूजा केली जाते.
- त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनीदेखील आगरतळा शहरात छटपूजा करत सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले.
- देशात भोपाळ, अगरतळा, कोलकाता, प्रतापगढ, पाटणा या ठिकाणी हा उत्सव यावर्षीदेखील मोठ्या उत्साहात साजरा झाल्याचे पाहायला मिळाले.
- बिहारमधील पाटणा शहरात गंगा नदीच्या किनारी मोठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा, दिल्ली अशा राज्यांत सार्वजनिक ठिकाणी छटपूजा करण्यास मनाई करण्यात आली होती
- शासनाने मास्क, सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम पाळण्याचे आवाहन केलेले असूनही देशीतील अनेक शहरांत मोठी गर्दी झाली.








