
पितृ दोष एक असा दोष मानला जातो. जो पितरांची अपूर्ण इच्छा, श्राद्ध, पिंडदान न झाल्यामुळे लागतो. पितृ दोषामुळे लोकांच्या जीवनात वेगवेगळया प्रकारच्या बाधा येतात. त्यामुळे आयुष्यात एकप्रकारची अनिश्चितता असते.

पितृ दोषामुळे आर्थिक तंगी, स्वास्थ्यशी संबंधित समस्या, संतान सुखाची कमतरता आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. पितृ दोष दूर करण्यासाठी पितृपक्षात काही उपाय केल्यास त्याचा लाभ प्राप्त होतो.

पितृ दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी पितरांच श्राद्ध कर्म नेहमी वेळेवर करा. त्यांच्या तिथिला श्राद्ध आणि तर्पण देण खूप आवश्यक असतं. सोबतच पितृ पक्षात ब्राह्मणांना घरी आमंत्रित करा. त्यांना आदरपूर्वक भोजन द्या.

पितृ पक्षा दरम्यान पितरांच्या आत्मा शांती आणि पितृ दोषातून मुक्तीसाठी दर महिन्याच्या अमावस्या तिथीला पितरांच्या नावे दान-पुण्य जरुर करा. नियमितरित्या दर अमावस्येला पितरांच्या नावे धार्मिक कार्य करा. पिृत दोषातून मुक्ती मिळेल. पितरांचा आशीर्वाद राहीलं.

पितृ दोषातून मुक्तीसाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाच्या झाडाला पितराचं प्रतीक मानलं जातं. शनिवार आणि अमावस्या तिथिला पिपळाच्या झाडाला जल अर्पण करा. पितरांची चुकीसाठी क्षमा मागा.