
मुंबई KEM हॉस्पिटल येथील जुन्या इमारतीमध्ये ग्रॉऊंड फ्लोअर मध्ये पाणी शिरलं आहे. ज्यामुळे रुग्णालयात गोंधळ उडाला आहे.

गोरेगाव येथे देखील पावसाने जोरधार हजेरी लावली आहे. ज्यामुळे रस्त्यांवर देखील पाणी साचलं आहे. पहिल्याच पावसात पणी मोठ्या प्रमाणात साचलं आहे.

रात्रभर मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. सोशल मीडियावर देखील मुंबईच्या पहिल्या पावसाने फोटो व्हायरल होत आहेत.

मरीन ड्राईव्ह येथे देखील पाणी साचलं आहे. मुसळधार पाऊस असल्यामुळे नागरिकांनी मरीन ड्राईव्ह परिसरात जाणं टाळलं पाहिजे.

जीएसटी विभाग मुंबई माझगाव येथील कार्यालयात देखील पाणी शिरलं आहे. सध्या पाणी काढण्याचं काम सुरु आहे.

मुंबईत पहाटेपासून पडणाऱ्या पावसाचा परिणा रेल्वे सेवेवरही दिसून येत असून मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरू आहे.

हिंदमाता, दादर, परळ परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुढील दोन तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढील 3-4 तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील 3 दिवस मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गला ऑरेंज’ इशारा आहे.

29 मेनंतर पावसाचा जोर मंदावेल, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. पहिल्याच पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.