
राम दरबारची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारणही करण्यात आले. जगभरात प्रथमच राम दरबाराची झलक दिसली. पूजे दरम्यान विहंगम दृश्य दिसले. जगभरात राम दरबाराचे प्रथम दर्शन आज झाले.

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर बनवण्यात आले. 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. त्यानंतर 5 जून 2025 रोजी भव्य राम दरबारसह अन्य मंदिरांची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली.

राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामलल्लासोबत आता राम दरबाराचे दर्शनही भाविकांना करता येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मुख्य अतिथी होते. अयोध्या आणि काशीमधील 101 आचार्य वैदिक मंत्रांचे धार्मिक अनुष्ठान करत आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मंदिर परिसर सजवण्यात आला आहे. संपूर्ण वातावरण वैदिक मंत्रांनी उर्जामय झाले आहे. आठ मूर्तींना पहिल्या दिवशी शैय्याधिवास करण्यात आले होते. त्यांना सकाळी 6:45 वाजता चेतन अवस्थेत आणण्यात आले. त्यानंतर त्यांचे जलस्नान करुन वैदिक मंत्रांचा जाप सुरु झाला.

श्री रामजन्मभूमी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राजदरबारात भगवान राम यांची मूर्ती विराजमान झाली आहे. पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यात राम दरबार स्थापन करण्यात आला आहे आणि त्याची प्राण प्रतिष्ठापना आज करण्यात आली.