PHOTO | कोरोनाला हरवून ‘लव्हबर्ड्स’ रणबीर-आलिया मालदीवला रवाना!
कोरोनातून बरे झाल्यानंतर बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरही (Ranbir Kapoor) मालदीवला रवाना झाले आहेत.

यादरम्यान, आलियाने एक अतिशय स्टायलिश मास्क देखील परिधान केला होता, ज्यावर हृदयाचे डिझाईन कोरलेला होता.
- महाराष्ट्राने 15 दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला असून, हा लॉकडाऊन वाढवण्याचा देखील सरकार विचार करत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटांचे शूटिंग मध्यावरच थांबले आहे, यामुळे आता चित्रपटातील कलाकारांची पावले पुन्हा एकदा मालदीवकडे वळली आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरही (Ranbir Kapoor) मालदीवला रवाना झाले आहेत.
- आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना आज (19 एप्रिल) मुंबई विमानतळावर स्पॉट केले गेले आहे. दोघांनीही या दरम्यान मॅचिंग कपडे घातले होते. एकीकडे, आलियाने पांढऱ्या रंगाचे जॅकेट आणि पिवळ्या क्रॉप टॉपसह एक मॅचिंग ट्राऊजर परिधान केली होती. दुसरीकडे रणबीर कपूरने व्हाईट टी-शर्ट आणि डेनिम परिधान केले होते.
- रणबीर आणि आलिया दोघेही एकाच कारमधून विमानतळावर पोहोचले होते.
- यादरम्यान, आलियाने एक अतिशय स्टायलिश मास्क देखील परिधान केला होता, ज्यावर हृदयाचे डिझाईन कोरलेला होता.
- गेल्या महिन्यात रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांनंतर आलियाचा कोरोना अहवालही सकारात्मक आला. दोघांनाही आपापल्या घरी अलगीकरणात ठेवण्यात आले होते. यादरम्यान, दोघांनीही एकमेकांना खूप मिस केले, जे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्टपणे दिसून येत होते.





