बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला आज मुंबईतील एका क्लिनिकच्या बाहेर स्पॉट केले गेले. यावेळी त्याची पूर्णपणे बदललेली स्टाईल पाहायला मिळाली.
मात्र, यावेळी क्लिनिकबाहेर पापराझी पाहून रणबीर कपूर खूप चिडला होता.
काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाचा संसर्ग झाला होता. ज्यानंतर आता त्याची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे.
रणबीर कपूर आज आपल्या डॉक्टरांना भेटायला आला होता. जिथे त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. अभिनेत्याची ही छायाचित्रे पाहून असे दिसते की, तो पापाराझींच्या कॅमेऱ्यात येऊ इच्छित नव्हता.
रणबीर कपूरनंतर त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्टलाही कोरोना इन्फेक्शन झाले आहे.
रणबीर कपूर लवकरच आलिया भट्टशी लग्न करणार आहे. कदाचित ते दोघे पुढच्या वर्षी लग्नबंधनात अडकू शकतात.