
अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा आज (22 मे) 24 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनन्या पांडे, शनाया कपूर आणि नव्या नवेली नंदा या सुहानाच्या लहानपणापासूनच्या मैत्रिणींनी तिला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

सुहानाच्या ग्लॅमरस अंदाजाचे असंख्य चाहते आहेत. तिच्या फिटनेसचीही चर्चा होते. मात्र लहानपणापासून ते आतापर्यंत सुहानाच्या दिसण्यात बराच फरक झाला आहे. सुहानाने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलंय.

शालेय शिक्षणानंतर ती न्यूयॉर्कला पुढील अभ्यासासाठी गेली. तिथेच तिने पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि अभिनयाचा कोर्स केला. सुहानाने गेल्या वर्षी 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.

शाहरुखची लेक असल्याने सुहाना लहानपणापासूनच माध्यमांच्या आणि फोटोग्राफर्सच्या नजरेत असायची. लोकांचं इतकं लक्ष मला आवडत नाही, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. 2018 मध्ये सुहाना 'वोग इंडिया' या मासिकाच्या कव्हर पेजवर झळकली होती.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सुहाना ही 'मेबलीन न्यूयॉर्क' या प्रसिद्ध कॉस्मेटिक कंपनीची ब्रँड अँबेसेडर बनली. सुहानाने आतापर्यंत फक्त एकाच चित्रपटात काम केलंय. मात्र तरीही सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.