Photos : मोजता मोजता हात थकले! टोपली, बादली अन् बास्केटमध्ये नोटाच नोटा… गोडावूनमध्ये नोटांची आरास; थर्टी फर्स्टला साई चरणी इतके कोटी!

Photos : शिर्डी येथील साई बाबांच्या चरणी 8 दिवसांच्या कालावधीत 8 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. त्यांनी केलेल्या दानाचा आकडा आता समोर आला आहे. हा आकडा वाचून तुम्ही देखील आवाक व्हाल.

| Updated on: Jan 03, 2026 | 1:41 PM
1 / 5
नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण फिरायला गेले होते. ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळाली होती. काही जण हे शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. गेल्या आठ दिवसात साईबाबांच्या चरणी आठ लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी आले होते. आता या आठ दिवसात भाविकांनी केलेल्या दानाचा आकडा समोर आला आहे.

2 / 5
देणगी काऊंटरवर 3 कोटी 22 लाख 43 हजार 388 रुपये इतके दान जमा झाले आहे. तर पी आर ओ सशुल्क देणगी पासेसच्या माध्यमातून  2 कोटी 42 लाख 60 हजार रुपये मिळाले आहेत. दक्षिणा पेटीमध्ये 6 कोटी 2 लाख 61 हजार 006 रुपये आणि डेबीट क्रेडीट कार्ड , ऑनलाईन देणगी , चेक डी.डी.देणगी , मनी ऑर्डरद्वारे 10 कोटी 18 लाख 86 हजार 955 रुपये जमा झाले आहेत.

3 / 5
भाविकांनी केलेल्या दानामध्ये सोन्या आणि चांदीच्या देखील अनेक वस्तू आहेत. त्यामध्ये सोने - 293.910 ग्रॅम इतके म्हणजेच 36 लाख 38 हजार 610 रुपयांचे आहे. तसेच चांदी 5983.970 ग्रॅम 9 लाख 49 हजार 741 रुपयांची आहे.

4 / 5
26 देशातील परकीय चलनाच्या माध्यमातून 16 लाख 83 हजार 673 रुपये दान मिळाले आहे. सुवर्ण जडित हिरे मुकुट 80 लाख रुपयांचे आहे. ही सर्व देणगी मोजतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. देणगी मोजण्यासाठी टोपली, बादली अन् बास्केटचा वापर करण्यात येतो. त्यामध्ये नोटा ठेवण्यात येतात.

5 / 5
नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षात भाविकांकडून साईंच्या चरणी विक्रमी दान केले आहे. सुट्ट्यांच्या कालावधीत भाविकांकडून साईंच्या चरणी 8 दिवसांच्या कालावधीत तब्बल 23 कोटी 29 लाख 23 हजार 373 रुपये रकमेचे दान झाले आहे. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे.