IND vs NZ : अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद, एकाच वेळी दोन नकोसे विक्रम

भारताचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा चौथ्या टी20 सामन्यात फेल गेला. त्याला खातंही खोलता आलं नाही. पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने भारताचा डाव कोलमडला. यासह अभिषेकने दोन नकोसे विक्रम नावावर केले आहेत.

| Updated on: Jan 28, 2026 | 10:16 PM
1 / 5
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाला. त्याला खातंही खोलता आलं नाही. विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर अभिषेक पहिल्याच चेंडूवर बाद झाला. अभिषेक शर्मा गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतला.  (फोटो- PTI)

2 / 5
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. या चेंडूवर अभिषेकने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण फटका हवा तसा लागला नाही आणि झेलबाद झाला. यासोबत अभिषेकने एकाच वेळी दोन लाजिरवाणे विक्रम नावावर केले आहेत.  (फोटो- PTI)

3 / 5
पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात अभिषेकने स्फोटक फलंदाजी केली होती. तर दुसऱ्या आणि चौथ्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मालिकेतील हा त्याचा दुसरा गोल्डन डक आहे. उर्वरित दोन सामन्यांमध्ये त्याने 35 चेंडूत 84 धावा आणि 20 चेंडूत 68 धावा केल्या आहेत. (फोटो- BCCI Twitter)

4 / 5
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणाऱ्या भारतीय सलामीवीरांच्या नकोशा यादीत अभिषेक शर्मा सामील झाला आहे. या यादीत केएल राहुल, पृथ्वी शॉ, रोहित शर्मा आणि संजू सॅमसन यांचा समावेश आहे. मागील सामन्यात डावाच्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसन बाद झाला होता. (फोटो- BCCI Twitter)

5 / 5
अभिषेक शर्मा आता टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल्डन डक मिळवणाऱ्या भारतीय सलामीवीरांच्या यादीत सामील झाला आहे. केएल राहुल आणि संजू सॅमसन यांनीही प्रत्येकी दोनदा ही कामगिरी केली आहे. दरम्यान रोहित शर्मा तीन गोल्डन डकसह यादीत आघाडीवर आहे. (फोटो- BCCI Twitter)