IND vs SA : विराट कोहलीचा मोठा विक्रम अभिषेक शर्माच्या रडारवर, तिसऱ्या सामन्यात शक्य आहे का?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी20 सामना धर्मशाळा येथे खेळला जाईल. हा सामना मालिकेत आघाडी घेण्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. सध्या मालिकेत 1-1 ने बरोबरी आहे. या सामन्यात पुन्हा एकदा अभिषेक शर्माच्या खेळीकडे लक्ष असेल.

| Updated on: Dec 13, 2025 | 9:59 PM
1 / 5
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात जिंकणाऱ्या संघाला मालिका जिंकण्यासाठी पुढे दोन संधी असणार आहेत. (फोटो- BCCI Twitter)

2 / 5
अभिषेक शर्मा पहिल्या दोन सामन्यात काही खास करू शकला नाही. पहिल्या सामन्यात शर्मा 12 चेंडूत 17 धावा काढून बाद झाला, तर दुसऱ्या सामन्यात त्याने 8 चेंडूत 17 धावा केल्या. आता तिसऱ्या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. जर तसं केलं तर विराट कोहलीचा मोठा विक्रम नावावर करू शकतो.  (फोटो- BCCI Twitter)

3 / 5
अभिषेकने तिसऱ्या टी20 सामन्यात 87 धावांची खेळी केली तर विराट कोहलीने नऊ वर्षांपूर्वी केलेला विक्रम मोडेल. अभिषेक शर्माला एका कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा विक्रम करण्याची संधी आहे. त्याच्या तीन टी20 सामने आहेत. पण तिसऱ्या सामन्यात मोडणार का? याकडे लक्ष लागून आहे.  (फोटो- BCCI Twitter)

4 / 5
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने 2016 मध्ये खेळलेल्या 31 टी20 सामन्यांमध्ये 1614 धावा करून हा विक्रम केला होता. या कॅलेंडर वर्षात अभिषेक शर्माने खेळलेल्या 39 टी20 सामन्यांमध्ये 1533 धावा केल्या आहेत.  (फोटो- BCCI Twitter)

5 / 5
अभिषेक शर्माने 2025 या वर्षात तीन शतके आणि नऊ अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे अभिषेक शर्मा मोठी खेळी करू शकतो. धर्मशाला येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 87 किंवा त्याहून अधिक धावा केल्या तर 2025 मध्ये भारतासाठी टी20  मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.  (फोटो- BCCI Twitter)