Abhishek Sharma : अभिषेक शर्माचा आणखी एक अर्धशतकी विक्रम, फक्त 14 चेंडूत तोडफोड

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माचं वादळ घोंघावलं. त्याने या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसं काढली. चेंडू टाकला की टाकला थेट सीमेपार मारत होता. त्याने या सामन्यात एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

| Updated on: Jan 25, 2026 | 10:01 PM
1 / 5
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माचा झंझावात पुन्हा एकदा दिसून आला. अभिषेक शर्मा न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. त्यामुळे कुठे चेंडू टाकायचा असा प्रश्न न्यूझीलंडच्या गोलंदाजांना पडला होता.  (Photo- BCCI Twitter)

2 / 5
गुवाहाटी येथे झालेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अभिषेकने फक्त 14  चेंडूत अर्धशतक झळकावलं.  डावखुरा फलंदाज इशान किशनचा विक्रम अवघ्या 48 तासांत मोडत भारतासाठी दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
अभिषेक शर्माने 14 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 364.29 चा होता. भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये झळकावलेलं दुसरं वेगवान शतक आहे. 12 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा रेकॉर्ड युवराज सिंगच्या नावावर आहे.  (Photo- BCCI Twitter)

4 / 5
अभिषेक शर्माने 20 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. यात त्याने 7 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याने सूर्यकुमार यादवसह तिसऱ्या विकेटसाठी 40 चेंडूत नाबाद 102 धावांची भागीदारी केली. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
रोहित शर्माने न्यूझीलंड विरूद्ध टी20 मालिकेत सर्वाधिक षटकार मारले होते. त्याने एका टी20  मालिकेत 10 षटकार मारले होते. अभिषेक शर्माने आता त्याला मागे टाकत 13  षटकारांसह अव्वल स्थान गाठलं आहे.  (Photo- BCCI Twitter)