
अफगाणिस्तानचा कर्णधार आणि फिरकीपटू राशीद खानच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. आतापर्यंत असा विक्रम कोणीही नोंदवलेला नाही. राशीद खानने असं काय केली की त्याच्या विक्रमाची चर्चा होत आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत सविस्तर... (Photo: Afghanistan Cricket)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या 28व्या सामन्यात युएई आणि अफगाणिस्तान संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात राशीद खानने 4 षटकं टाकली. यात त्याने 24 धावा दिल्या आणि 1 विकेट काढली. या एका विकेटसह राशीदने टी20 क्रिकेटमध्ये 700 विकेटचा पल्ला गाठला आहे. (Photo: Afghanistan Cricket)

टी20 क्रिकेट इतिहासात आतापर्यंत 700 विकेटचा पल्ला अजून कोणीच गाठलेला नाही. यापूर्वी तीन गोलंदाजांनी 600 पेक्षा जास्त विकेट घेतल्याची नोंद होती. पण या यादीतून राशीद खानने पुढे पाऊल टाकलं आहे. आता 700विकेटच्या क्लबमध्ये असलेला एकमेव खेळाडू आहे. त्याने वयाच्या 27व्या वर्षी ही किमया केली आहे, हे विशेष (Photo: Afghanistan Cricket)

टी20 क्रिकेटमधील 513 डावात गोलंदाजी करणाऱ्या राशीद खानने 11794 चेंडू टाकले. यात त्याने 12961 विकेट धावा देत 700 विकेट काढले. आता टी क्रिकेटमध्ये 700 विकेट घेणारा एकमेव गोलंदाज ठरला आहे. (Photo: Afghanistan Cricket)

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो 631 विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर सुनील नरीन 613 विकेटसही तिसऱ्या स्थानावर आहे. सुनील नरीनही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे राशीद खानचा विक्रम अबाधित राहिल असंच दिसत आहे. (Photo: Afghanistan Cricket)