
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसर्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण गोलंदाजांनी लाज घालवली. दक्षिण अफ्रिकेने 20 षटकात 4 गडी गमवून 213 धावा केल्या. तसेच विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं. (फोटो- PTI)

अर्शदीप सिंगने दुसर्या टी20 सामन्यात सुमार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 54 धावा दिल्या आणि एकही गडी बाद करता आला नाही. यात सर्वात वाईट बाब म्हणजे एकूण 9 चेंडू वाइड टाकले. इतकंच काय तर नकोसा विक्रमही नावावर केला. (फोटो- PTI)

अर्शदीपने एका षटकात 13 चेंडू टाकले. यात त्याने 7 चेंडू वाइड टाकले. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरं सर्वात लांबलचक षटक टाकलं. अर्शदीपने या षटकात 18 धावा दिल्या. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर क्विंटन डी कॉकने षटकार मारला आणि लाइन अँड लेंथ बिघडली. (फोटो- PTI)

अर्शदीपच्या आधी अफगाणिस्तानच्या नवीन उल हकने इतकं लांब षटक टाकलं होतं. आयसीसीच्या पूर्ण सदस्य देशांमधील दोन गोलंदाजांनी केलेला नकोसा विक्रम आहे. अफगाणिस्तानच्या नवीन उल हकने 2024 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एका षटकात 13 चेंडू टाकले होते. (फोटो- PTI)

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जास्त षटक टाकण्याचा विक्रम 14 चेंडूंचा आहे. असोसिएट देशांमधील प्रत्येकी तीन गोलंदाजांच्या नावावर हा नकोसा विक्रम आहे. अर्शदीपचं वाइड षटक पाहून प्रशिक्षक गौतम गंभीरने डोक्यावर हात मारून घेतला. (फोटो- PTI)