
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 19 ऑक्टोबरपासून होणार आहे. भारतीय संघ या मालिकेत एकूण 2 मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेने दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे कमबॅक करणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या दोघांच्या कमबॅकची प्रतिक्षा आहे. रोहित-विराटचा आयपीएलच्या 18 व्या मोसमानंतरचा पहिलाच सामना असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना हा पर्थमध्ये होणार आहे. (Photo Credit : Axar Patel X Account)

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा सामना हा 23 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना एडलेडमध्ये होणार आहे.तर तिसरा आणि अंतिम सामना हा 25 ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. एकदिवसीय मालिकेतील सामन्यांना भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. (Photo Credit : Bcci)

एकदिवसीय मालिकेनंतर टी 20i सीरिजचा थरार रंगणार आहे. टी 20i मालिकेतील पहिला सामना हा 29 ऑक्टोबर रोजी कॅनबेरात होणार आहे. तर दुसरा सामना हा 31 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. (Photo Credit : Bcci)

उभयसंघातील तिसरा सामना 2 नोव्हेंबरला होबार्टमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर चौथा सामना 6 नोव्हेंबरला गोल्ड कोस्ट येथे होणार आहे. (Photo Credit : Bcci)

टी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा 5 नोव्हेंबरला ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. टी 20i मालिकेतील सामन्यांना भारतीय वेळेनुसार दुपारी पावणे 2 वाजता सुरुवात होणार आहे. (Photo Credit : Bcci)