
ऑस्ट्रेलिया आणि जापान यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात जापानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 202 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 गडी गमवून 29.1 षटकात पूर्ण केलं. (Photo- Cricket Australia X)

जापान विरूद्धच्या सामन्याच विजयाचा मानकरी ठरला तो विल मलाझुक.. आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 ऑस्ट्रेलियाकडून सलामीला उतरतो. त्याने जापानविरुद्धच्या सामन्यात सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. (Photo- Cricket Australia X)

विल मलाझुकने फक्त 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही मलाझुकची फलंदाजीची आक्रमकता कायम राहिली. त्याने 14व्या षटकात फक्त 51 चेंडूत शतक ठोकून इतिहास रचला. (Photo- ICC X)

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानच्या कासिम अक्रमच्या नावावर जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला होता. त्याने 2022 च्या अँटिग्वा येथील नॉर्थ साउंड येथे झालेल्या अंडर 19 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध 63 चेंडूत शतक ठोकले होते. (Photo- ICC X)

विल मलाझुकने वैभव सूर्यवंशीचा वनडे क्रिकेटमध्ये जलद शतकाचा विक्रम मोडला. वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्ध 52 चेंडूत शतक ठोकलं आहे. पण विलला फक्त 51 चेंडू लागले. या यादीत पाकिस्तानचा समीर मिन्हास आघाडीवर आहे. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध 42 चेंडूत शतक ठोकलं आहे. (Photo- ICC X)