
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा ही भारताची अनुभवी जोडी या मालिकेत खेळणार आहे. त्याआधी विराट आणि रोहितबाबत मोठी अपडेटसमोर आली आहे. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेनंतर रोहित आणि विराट संदर्भात महत्त्वाची बैठक होणार असल्याचा दावा केला जात आहे. (Photo Credit : PTI)

बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यात ही बैठक होणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. या बैठकीत रोहित आणि विराट आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेत खेळणार की नाही? याबाबत निर्णय होणार आहे. (Photo Credit : PTI)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट आणि रोहितबाबतची ही महत्त्वाची बैठक भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेनंतर होणार आहे. ही बैठक अहमदाबादमध्ये होणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : PTI)

"रोहित-विराट या दोघांना त्यांच्याकडून टीम मॅनेजमेंटला काय अपेक्षित आहे? तसेच टीम मॅनेजमेंट त्यांना कोणत्या भूमिकेत पाहत आहे? याबाबत सांगण्यात आलं. ते दोघे अनिश्चिततेसह खेळू शकत नाहीत", अशी माहिती बीसीसीआय सूत्राने दिल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. (Photo Credit : PTI)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने रोहित आणि विराट या दोघांना कामगिरीसह फिटनेसवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बाहेर सुरु असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया न देण्याचंही या दोघांना सांगण्यात आलं आहे. (Photo Credit : PTI)