आशिया कपमध्ये भारताचे हे तीन खेळाडू ठरतील सरस! स्पर्धेआधीच करून टाकलं जाहीर

आशिया कप स्पर्धेत भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. गतविजेता भारतीय संघ यंदाही जेतेपदाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. असं असताना या स्पर्धेत कोणत्या खेळाडूचा पत्ता चालेल सांगता येत नाही. पण माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने भाकीत वर्तवून टाकलं आहे.

| Updated on: Sep 08, 2025 | 7:30 PM
1 / 5
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत उतरणार आहे. भारताची भक्कम बाजू असून जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या या खेळाडूंकडून अपेक्षा आहेत. पण माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने या खेळाडूंनी वगळून इतर खेळाडूंवर विश्वास टाकला आहे.  (Photo: Instagram)

2 / 5
दिनेश कार्तिकच्या मते, भारतीय संघ यंदा जेतेपदाचा प्रमुख दावेदार आहे. क्रीडारसिक आणि तज्ज्ञांचं मत देखील असंच आहे. त्यामुळे भारतीय जेतेपद मिळवेल यात काही शंका व्यक्त करता येणार नाही. एखाद उलटफेर झाला तरंच हे भाकीत खोटं ठरू शकतं.  (Photo: PTI)

3 / 5
दिनेश कार्तिकच्या मते आशिया कप स्पर्धेत सूर्यकुमार यादव नाही तर शुबमन गिलचा पत्ता चालेल. बऱ्याच कालावधीनंतर शुबमन गिलचं आशिया कप स्पर्धेत पुनरागमन झालं आहे. तसेच त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा आहे. त्याचा फॉर्म पाहता नक्कीच मोठी कामगिरी करू शकतो.  (Photo: PTI)

4 / 5
युएईतील खेळपट्ट्या या फिरकीला मदत करणाऱ्या असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती या स्पर्धेत हुकुमाचा एक्का ठरू शकतो. तसेच सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरू शकतो. वरुण चक्रवर्तीने दुबईत पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक 9 विकेट घेतल्या होत्या.  (Photo: PTI)

5 / 5
दिनेश कार्तिकने घेतलेलं तिसरं नाव हे जितेश शर्माचं आहे. खरं तर त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळेल की नाही याबाबत शंका आहे. संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. पण जितेशला संधी मिळाली तर संधीचं सोनं करू शकतो. आयपीएलमध्येही जितेशने फिनिशिंगची भूमिका बजावली आणि आरसीबीला विजय मिळवून दिला होता. (Photo: Getty Images)