कसोटीत एकाच डावात पाच विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची पहिली जोडी माहिती आहे का? 1887 मध्ये असं घडलं होतं?

इंग्लंड पाकिस्तान कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ओली रॉबिनसन आणि जोश टंग यांनी कमाल केली. दोघांनी प्रत्येकी 5 विकेट घेऊन पाकिस्तानचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला. त्यामुळे अशी कामगिरी यापूर्वी पहिल्यांदा कधी घडली होती? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

| Updated on: Aug 20, 2026 | 6:39 PM
1 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात प्रत्येकी पाच विकेट घेणारी नवी जोडी म्हणून ओली रॉबिनसन आणि जोश टंग यांना मान मिळाला आहे. या जोडीने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात प्रत्येक 5-5 विकेट घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी पहिल्यांदा 1887 मध्ये घडली होती. (Photo: Getty Image)

2 / 5
कसोटी क्रिकेटच्या एका  डावात प्रत्येकी पाच विकेट घेण्याचा मान ऑस्ट्रेलियाच्या जॉन फेरिस आणि चार्ली टर्नर यांच्या नावावर आहे. या दोघांनी 1887 मध्ये सिडनीत खेळलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात 5-5 विकेट घेतल्या होत्या. (Photo: Getty Image)

3 / 5
इंग्लंडसाठी पाच-पाच विकेट घेणारी पहिली गोलंदाजांची जोडी ही जॉर्ज लोहमन आणि बॉली पील होती. या दोघांनी 1888 मध्ये सिडनीत खेळलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात प्रत्येकी 5 विकेट घेण्याची कामगिरी केली होती. (Photo: Getty Image)

4 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी 5-5 विकेट घेणारी पहिली जोडी लाला अमरनाथ आणि वीन मांकड यांची होती. त्याने 1946 मध्ये मॅन्चेस्टर कसोटीत इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात ही कामगिरी केली होती.  (Photo: Getty Image)

5 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक पाच विकेट घेणाऱ्या जोड्या या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या आहेत. दोन्ही संघाकडून ही कामगिरी 16वेळा करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहेत.  (Photo: Getty Image)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us