AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची भीती तेच घडले, राज्यात ऑक्टोबर हीट, भारतीय हवामान विभागाचा थेट अलर्ट..

राज्यातून मॉन्सून परत गेला. यंदा अपेक्षित पाऊस झाला नाही. शेतकरी चिंतेत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात ऑक्टोबर हीट बघायला मिळतंय. उष्णता प्रचंड वाढताना दिसतंय.

ज्याची भीती तेच घडले, राज्यात ऑक्टोबर हीट, भारतीय हवामान विभागाचा थेट अलर्ट..
Indian weather
| Updated on: Oct 05, 2026 | 8:06 AM
Share

राज्यातून मॉन्सूनचा पाऊस गायब झाला. राज्यात यंदा पाऊस कमी झाला. अनेक ठिकाणी दुष्काळीची स्थिती आहे. शेतकरी चिंतेत आहे. सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर केला. शेतकऱ्यांना मदत सरकारकडून केली जात आहे. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तगदा न लावण्याच्या सूचनाही राज्य सरकारने दिल्या. त्यातच आता पावसाने माघार घेतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यातच हीट वाढली आहे. मुंबईत पारा 36 अंशांवर पोहोचला आहे. ऑक्टोबर सुरू होताच राज्यात उष्णतेचा चटका जाणवू लागला आहे. मुंबईत रविवारी कमाल तापमान 36.1 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हे तापमान सरासरीपेक्षा 2.5 अंशांनी अधिक आहे. त्यामुळे सकाळच्या तुलनेत दुपारनंतर मुंबईकरांना उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत आहे.

दरम्यान, अकोला येथे सर्वाधिक 37.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यातही उष्णता जाणवत असून छत्रपती संभाजीनगर येथे 36 अंश, परभणी 35.3 अंश आणि धाराशिव 33.1 अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले. विदर्भात ऑक्टोबर हिटचा प्रभाव अधिक जाणवत असून अकोला येथे 37.1 अंश तापमानाची नोंद झाली. अमरावती 36.4, चंद्रपूर 36.4, वर्धा 36, बुलढाणा 35.2, ब्रह्मपुरी 35.2, नागपूर 35 आणि वाशिम 35 अंश अशा तापमानाची नोंद झाली.

राज्यातून मॉन्सून गेला मात्र त्यानंतर उष्णता प्रचंड वाढली आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. स्थिती गंभीर आहे, पिण्याच्या पाण्याचा विषय गंभीर आहे. पाऊस पाणी नसल्याने लोकांना रोजगार मिळत नाहीये. कामासाठी लोक शहरंकडे येत आहेत. दुष्काळाचा फटका मोठ्या प्रमाणात शेतमजुरांना मिळतोय. शेतमजुरांचे दसरा-दिवाळीपूर्वीच स्थलांतर सुरू झाले. सोयाबीन, कापूस पिके हातची गेल्याने ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. शेतात काम नसल्याने मजूर कुटुंबांसह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होत आहेत.

सोनपेठमधून पुण्यासाठी जाणाऱ्या खासगी बसमध्ये स्थलांतरित मजुरांचे प्रमाण वाढले आहे. बालाघाट आणि अजिंठा डोंगररांगांतील गावांमध्ये स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे. ऑक्टोबर महिन्यात हीट वाढली आहे. मुंबईसह कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील इतरही भागात उन्हाचा चटका वाढताना दिसतोय. त्यातच हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला.

Follow Us
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; राजेश पाटील..
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?
संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया...
Pratap Sarnaik On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?