
इंग्लंडने फीफा वुमन्स वर्ल्डकपच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया - ने पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत स्पेनशी सामना होणार आहे. (PC: PTI)

स्पेन आणि इंग्लंड दोन्ही संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांकडे स्पर्धेचं यजमानपद आहे. (PC: PTI)

ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत सुपरस्टार प्लेयर सॅम केर हीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली होती. तिने ऑस्ट्रेलियासाठी एकमेव गोल केला. (PC: PTI)

या सामन्यात 36 व्या मिनिटाला इला टूने हीने गोल मारत इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. 63 व्या मिनिटाला सॅम केरने गोल मारला आणि 1-1 ने बरोबरी साधली. 71 व्या मिनिटाला लॉरेन हँप हीने गोल मारला आणि इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. (PC: PTI)

90 मिनिटांचा खेळ संपण्याच्या 4 मिनिटांपूर्वी एलेसिया रुसोने एक गोल मारला. त्यामुळे इंग्लंडचा विजय झाला. (PC: PTI)