
आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर 2023 स्पर्धेतील सुपर 6 फेरीतील आठव्या सामन्यात स्कॉटलँडच्या ब्रँड मॅकमुलेन याने खणखणीत शतक ठोकलं.

मॅकमुलेन याने 106 धावांची खेळी केली. या शतकाच्या जोरावर स्कॉटलँडने नेदरलँडला विजयासाठी 278 धावांचं आव्हान दिलंय

ब्रँडन मॅकमुलेन याने 110 बॉलमध्ये 106 धावा केल्या. मॅकमुलेन याने या शतकी खेळीत 11 चौकार आणि 3 सिक्स ठोकले. याचाच अर्थ असा की 106 पैकी 62 धावा या 14 बॉलमध्ये केल्या.

ब्रँडन मॅकमुलेन याचं या आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर 2023 स्पर्धेतील दुसरं शतक ठरलं.

मॅकमुलेन याने 25 जून रोजी ओमान विरुद्ध 121 बॉलमध्ये 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 136 धावंची खेळी केली होती.

मॅकमुलेन याने या स्पर्धेत बॅटिंगसह बॉलिंगनेही शानदार कामगिरी केलीय. मॅकमुलेन याने आतापर्यंत या स्पर्धेत अनुक्रमे आयर्लंड, यूएई आणि ओमान विरुद्ध प्रत्येकी 1, विंडिज विरुद्ध 3 आणि झिंबाब्वे विरुद्ध 2 अशा एकूण 8 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान आता नेदरलँडला वर्ल्ड कप मुख्य स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी 278 धावा कराव्या लागणार आहेत. तर स्कॉलँडला 10 विकेट्स घ्याव्या लागतील. त्यामुळे वर्ल्ड कपमधील दहावी टीम कोणती, हे थोड्याच वेळाच स्पष्ट होईल.