
रोहित शर्मा: चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार रोहित शर्मा फेल ठरला. त्याने सलामीला खेळताना 14 चेंडूत 8 धावा केल्या. तो जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला.

विराट कोहली: विराट कोहलीही चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पहिल्यांदाच भारताच्या जर्सीमध्ये दिसला. पर्थमधील सामन्या कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. कोहलीने आठ चेंडू खेळले, मात्र तो एकही धाव काढू शकला नाही.

शुभमन गिल: एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळणारा गिल देखील फ्लॉप झाला. गिलने 18 चेंडूत फक्त 10 धावा केल्या. त्याने दोन चौकार मारले. त्याला नॅथन एलिसने बाद केले.

श्रेयस अय्यर: भारताचा नवा उपकर्णधार श्रेयस अय्यरही फेल गेला. त्याने 28 चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने 11 धावा केल्या. सुरुवातीचे हे चारही फलंदाज फेल गेल्यामुळे भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.

हर्षित राणा: हर्षित राणा या सामन्यात फेल गेला. त्याने 4 ओव्हरमध्ये 27 धावा दिल्या, मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही. आता पुढील सामना 23 ऑक्टोबर रोजी अॅडलेडमध्ये होणार आहे.