IND vs SA: विराट विशाखापट्टणममध्ये कोणता अवतार दाखवणार? किंग कोहलीची या मैदानातील आकडेवारी एकदा पाहाच
Virat Kohli Visakhapattnam Odi Runs Record : आतापर्यंतची आकडेवारी पाहता विराट कोहली 6 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक करेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पाहा भारताच्या या दिग्गज फलंदाजाने या स्टेडियममध्ये किती धावा केल्या आहेत.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे. मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये सामन्यासह मालिका विजयासाठी रस्सीखेच असणार आहे. या सामन्यातही विराट कोहली याच्याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit: PTI)

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आतापर्यंत या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात शतक झळकावलं आहे. विराटने रांचीत 135 तर रायपूरमध्ये 102 धावा केल्या आहेत. (Photo Credit: PTI)

आता विराटने तिसऱ्या आणि मालिकेच्या दृष्टीने निर्णायक अशा सामन्यातही शतक करुन भारताला विजयी करावं, अशी आशा चाहत्यांना आहे. चाहत्यांना या सामन्यात विराटकडून 2 पैकी कोणताही 1 विक्रम होताना पाहायला मिळू शकतो. (Photo Credit: PTI)

विराटने आतापर्यंत विशाखापट्टणममध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील 7 डावांत 3 शतक आणि 2 अर्धशतकासह एकूण 587 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटची आकडेवारी पाहता तो सलग तिसरं शतक करणार, असा विश्वास चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. (Photo Credit: PTI)

तर आकडेवारी पाहता विराटला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात काही खास करता आलेलं नाही. विराट 2011 साली फायनलमध्ये 2 धावांवर आऊट झाला होता. रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फलंदाजाने 2015 साली 5 धावा केल्या होत्या. त्यामुळे विराटचा 6 डिसेंबरला कोणता अवतार पाहायला मिळेल? हे त्याच्या खेळीनंतरच स्पष्ट होईल. (Photo Credit: PTI)