
टीम इंडियाच्या शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या फलंदाजानी पाकिस्तानचा नंबर 1 बॉलिंगचा बाजा वाजवला. या फलंदाजांनी थोडफोड बॅटिंग केली. मात्र टीम इंडियाची हेच फलंदाज श्रीलंकेच्या 20 वर्षांच्या युवा फिरकी गोलंदाजासमोर फ्लॉप ठरले. दुनिथ वेल्लालागे याने सलग 5 झटक देत टीम इंडियाला बॅकफुटवर ढकललंय. तसेच त्याने यासह मोठा रेकॉर्ड केलाय.

दुनिथ वेल्लालागे याने शुबमन गिल याला आऊट करत श्रीलंका आणि स्वत:च्या विकेटचं खातं उघडलं. दुनिथने शुबमनचा ऑफ स्टंप उडवला. शुबमन 13 धावा करुन माघारी परतला.

दुनिथने त्यानंतर विराट कोहली याला 3 धावांवर दासून शनाकाच्या हाती कॅच आऊट केलं. दुनिथ आणि श्रीलंकेची ही दुसरी विकेट ठरली.

त्यानंतर दुनिथने कॅप्टन रोहित शर्मा याला क्लिन बोल्ड केला. रोहितने 53 धावांची अर्धशतकी खेळी.

दुनिथने चौथी विकेट घेत सेट जोडी फोडली. दुनिथने केएल राहुल याला 39 धावावंर आपल्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं. केएल आणि ईशान या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. दुनिथने ही जोडी फोडून टीम इंडियाला पुन्हा अडचणीत आणलं.

त्यानंतर दुनिथने हार्दिक पंड्या याला कुसल मेंडीसच्या हाती कॅच आऊट केलं. हार्दिकने 5 धावा केल्या.

दुनिथ वेल्लालागे याने यासह आपल्या वनडे करिअरमध्ये पहिल्यांदा 5 विकेट घेण्याचा कारनामा केला. दुनिथ टीम इंडिया विरुद्ध 5 विकेट्स घेणारा चौथा फिरकी बॉलर ठरला.