
भारताने इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना 6 धावांनी जिंकला. यासह भारताने मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. अशा स्थितीत अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी कोणाला मिळणार हा प्रश्न होता. पण त्याचं उत्तर आता स्पष्ट झालं आहे. (फोटो- BCCI Twitter)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पतौडी ट्रॉफी कसोटी मालिकेचे नाव आता अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी असे ठेवण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मागील पतौडी ट्रॉफी कसोटी मालिका इंग्लंडने जिंकली होती. त्यामुळे ही मालिका अनिर्णित राहिली तर ट्रॉफी इंग्लंडकडेच राहील असं सांगितलं जात होतं. (फोटो- BCCI Twitter)

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, पतौडी ट्रॉफीच्या नावाखाली आयोजित कसोटी मालिका कोणी जिंकली हे येथे विचारात घेतले जाणार नाही, अशी चर्चा आहे. याचा अर्थ असा की जर ही मालिका अनिर्णित राहिल्याने ट्रॉफी ईसीबी मुख्यालयात ठेवली जाईल. (फोटो- BCCI Twitter)

ईसीबीचे मुख्यालय लॉर्ड्स येथे आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका अनिर्णित राहिल्याने ट्रॉफी लॉर्ड्स येथे ठेवली जाईल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका अनिर्णित राहिल्यानंतर ट्रॉफी लॉर्ड्स येथे ठेवली जाते. (फोटो- BCCI Twitter)

कसोटी मालिकेत लीड्समध्ये टीम इंडियाला हरवणारा इंग्लंड एजबॅस्टनमध्ये हरला. त्यानंतर इंग्लंडने लॉर्ड्सवर सामना जिंकला, तर मँचेस्टर कसोटी अनिर्णित राहिली. आता, ओव्हलमध्ये भारताने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. (फोटो- BCCI Twitter)