टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा चॅम्पियन भारत होणार! असे जुळून आले चार योग

टीम इंडिया टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदापासून एक विजय दूर आहे. टीम इंडियाचा अंतिम फेरीत न्यूझीलंडशी सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासोबत चार योग जुळून आले आहेत. त्यामुले सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवेल, असं क्रीडाप्रेमींना वाटत आहे.

| Updated on: Mar 07, 2026 | 8:11 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना 8 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. भारताकडे सलग दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे, विजयासाठी चार योगही जुळून आले आहेत.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना 8 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. भारताकडे सलग दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे, विजयासाठी चार योगही जुळून आले आहेत.

2 / 5

झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला जेव्हा पराभूत केलं आहे तेव्हा भारत चॅम्पियन झाला आहे. 1983 च्या वनडे वर्ल्डकप, 2007 च्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हा योग जुळून आला होता. आता झिम्बाब्वने या स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. त्यामुळे जेतेपद मिळवेल, अशी आशा क्रीडाप्रेमी बाळगून आहेत.

3 / 5

2011 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने श्रीलंकेला पराभूत करून जेतेपद मिळवलं होतं. तेव्हा भारत हा घरच्या मैदानावर विजयी ठरलेला पहिला संघ ठरला होता. आता कोणत्याही संघाने घरच्या मैदानावर टी20 वर्ल्डकप जिंकलेला नाही. आता ही संधी भारताकडे आहे.

4 / 5

2011 चा वनडे वर्ल्डकप जिंकण्यापूर्वी भारताला दक्षिण अफ्रिकेकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत तसंच झालं आहे. या स्पर्धेत भारताचा एकमेव पराभव झाला आहे. दक्षिण अफ्रिकेने भारताला पराभूत केलं आहे.

5 / 5

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारत इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना जिंकणारा संघ चॅम्पियन ठरला आहे. 2022 मध्ये इंग्लंडने भारताला उपांत्य फेरीत हरवलं होतं आणि जेतेपद मिळवलं होतं. तर 2024 मध्ये भारताने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली होती. आताही तसंच झालं आहे. त्यामुळे हा योग जुळून आला तर भारत जेतेपदाचा मानकरी ठरेल. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us