भारतीय महिला हॉकी संघाचा हिरमोड, जापानने पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट कापलं

| Updated on: Jan 19, 2024 | 7:57 PM

भारतीय महिला हॉकी संघ 2016 नंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरला. पात्र होण्यासाठी टीम इंडियाकडे शेवटची संधी होती. पण जापानने भारताचं स्वप्न धुळीस मिळवलं. जापानने भारतावर 1-0 ने विजय मिळवला.

1 / 6
पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे भारतीय महिला हॉकी संघाचे स्वप्न भंगलं आहे. महिला हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठीच्या प्लेऑफ सामन्यात संघाला जापानविरुद्ध 0-1 ने पराभव पत्करावा लागला.

2 / 6
भारतीय महिला हॉकी संघ 2016 नंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरला आहे. टीम इंडियाला यापूर्वी सेमीफायनलमध्ये जर्मनीविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

3 / 6
उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची दुसरी संधी मिळाली. पण त्या संधीचं सोनं करण्यात अपयश आलं.

4 / 6
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली होती. तिने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण पदक जिंकता आलं नाही. संघ चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.

5 / 6
पात्रतेसाठी महत्त्वाच्या सामन्यात जापानकडून एकमेव गोल उराता कानाने केला. सहाव्या मिनिटालाच तिने संघाला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर भारतीय खेळाडू बरोबरी साधण्यासाठी धडपडत राहिले.

6 / 6
टीम इंडियाने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये जापानला गोल करू दिला नाही. पण गोल करण्याच्या अनेक संधीही गमावल्या. जापानचा संघ ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसेल.