INDW vs PAKW: स्मृती मंधानाने अर्धशतकी खेळीसह टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नोंदवली अशी कामगिरी, जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. या सामन्यात स्मृती मंधानाने अर्धशतक ठोकून एक विक्रम नोंदवला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत लढत होत आहे. भारताने प्रथम फलंदाजी करून 20 षटकात 170 धावा केल्या. तसेच विजयासाठी 171 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात स्मृती मंधानाने झंझावाती अर्धशतक ठोकलं. (Photo: BCCI Women Twitter)

भारताच्या दोन विकेट झटपट पडल्यानंतर स्मृती मंधानाने एक बाजू सावरून धरली. तिने 34 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार मारत 50 धावा केल्या. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतलं स्मृती मंधानाचं हे पाचवं अर्धशतक आहे. (Photo: BCCI Women Twitter)

स्मृती मंधानाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 26 डावात हे पाचवं अर्धशत ठोकलं आहे. मिताली राजने ही कामगिरी 23 डावात, तर हरमनप्रीत कौरने ही कामगिरी 34 डावात केली आहे. पुनम राऊतने 15 डावात तीन अर्धशतकं ठोकली आहेत. (Photo: BCCI Women Twitter)

स्मृती मंधानाने या खेळीसह टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरं स्थान पटकावलं आहे. हरमनप्रीत कौर 762 धावांसह पहिल्या, मिताली राज 726 धावांसह दुसऱ्या, तर स्मृती मंधाना 592 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo: BCCI Women Twitter)

स्मृती मंधानाने 44 चेंडूत 68 धावांची खेळी करून बाद झाला. स्मृती मंधानाने 9 चौकार आणि 2 षटकार मारत या धावा केल्या. तिने 154.55 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. रमीन शमिमच्या गोलंदाजीवर फातिमा सानाने तिचा झेल पकडला आणि तिचा खेळ आटोपला. (Photo: BCCI Women Twitter)