
आयपीएल 2025 स्पर्धेत मोहम्मद सिराज हा गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. त्याच्या गोलंदाजीला आणखी धार चढली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 33 धावा देत 2 गडी बाद केले.

चार षटकं टाकताना मोहम्मद सिराजने 8 निर्धाव चेंडू टाकले. म्हणजेच मोहम्मद सिराजने 24 चेंडूपैकी 8 चेंडूवर एकही धाव दिली नाही. आठ चेंडूसह मोहम्मद सिराजने या स्पर्धेत सर्वाधिक डॉट चेंडू टाकण्याच्या यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये 38 षटके टाकणाऱ्या मोहम्मद सिराजने 107 डॉट बॉल टाकले आहेत. यासह, तो आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकणारा गोलंदाज बनला. दरम्यान, सिराजने 14 विकेट्सही घेतल्या आहेत.

या यादीत चेन्नई सुपर किंग्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून 10 सामन्यांमध्ये 35.4 षटके टाकणाऱ्या खलीलने एकूण 106 डॉट बॉल टाकले आहेत. या काळात त्याने 14 विकेट्सही घेतल्या आहेत.

या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड तिसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीसाठी 10 सामन्यांमध्ये 36.5 षटके टाकणाऱ्या हेझलवूडने 103 डॉट बॉलसह एकूण 18 विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)