
मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 59 धावांनी पराभूत करत प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने 3 गडी बाद केले. यासह त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने 3.2 षटकात फक्त 12 धावा देत 3 गडी बाद केले. यासह आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा एका सामन्यात तीन विकेटहून अधिक विकेट घेण्याचा मान मिळवला आहे.

जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये 25 वेळा अशी कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराहनंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर युझवेंद्र चहल येतो. त्याने 22 वेळा अशी कामगिरी केली आहे.

जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने केकेआरच्या सुनील नरीनला मागे टाकले आहे. बुमराहने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 23 सामन्यात 28 विकेट्स घेतल्या आहेत. तर सुनील नरीनने 24 सामन्यांमध्ये 27 विकेट्स घेतल्या आहेत.

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. आता टॉप 2 च्या स्थानावर लक्ष आहे. पण गुणतालिका पाहता मुंबईला एलिमिनेटर सामना खेळावा लागेल अशी स्थिती आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय/आयपीएल)