RCB vs MI: 1000 ते 14000 पर्यंत रेकॉर्डची संधी, मुंबई इंडियन्सविरुद्ध विराट कोहली करणार कारनामा

आयपीएल 2026 स्पर्धेतील 54वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. या सामन्यात दोन मोठे विक्रम रचण्याची संधी विराट कोहलीकडे आहे.

| Updated on: May 10, 2026 | 4:44 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेतील 54व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात विराट कोहलीकडे मोठा विक्रम रचण्याचीस संधी आहे. यासाठी त्याला या सामन्यात 28 ते 72 धावांची खेळी करावी लागणार आहे. विराट कोहलीकडे टी20 क्रिकेटमध्ये एका खास यादीत समाविष्ट होण्याची संधी आहे. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
विराट कोहलीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात 28 धावा करताच एक खास विक्रम नावावर करणार आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध 1000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 34 डावात 32.40 च्या सरासरीने आणि 128च्या स्ट्राईक रेटने 972 धावा केल्या आहेत. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
विराट कोहलीने मुंबई इंडियन्सविरुद्ध सात अर्धशतकं ठोकली आहे. पण एकही शतक ठोकता आलेलं नाही. या आकडेवारीत आयपीएलशिवाय चॅम्पियन्स लीग टी20 सामन्यांचा समावेश आहे. विराट कोहलीने आतापर्यंत चार आयपीएल संघांविरुद्ध 1000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 1174, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 1172, पंजाब किंग्सविरुद्ध 1159 आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 1021 धावा केल्या आहेत. आता मुंबई इंडियन्सविरुद्ध हा पराक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
विराट कोहली आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 14 हजार धावांचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आहे. त्याने 407 डावांमध्ये 108 अर्धशतके आणि नऊ शतकांसह 13922 धावा केल्या आहेत. 72 धावा करताच टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरेल. ख्रिस गेल, कायरोन पोलार्ड, ॲलेक्स हेल्स, डेव्हिड वॉर्नर आणि जोस बटलर यांनी ही कामगिरी केली आहे. (Photo: IPL/BCCI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us