RCB vs MI: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिक पांड्याच्या फिटनेसचं काय? या दिवशी होणार फैसला

आयपीएल स्पर्धेत स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना 10 मे रोजी रायपूरमध्ये मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात होणार आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं होतं. आता परतफेड करण्याची वेळ आली आहे. असं असातना कर्णधार हार्दिक पांड्याचं फिटनेस आणि उपकर्णधार खेळणार की नाही याबाबत बातमी समोर आली आहे. चला जाणून घेऊयात

| Updated on: May 09, 2026 | 5:06 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची प्लेऑफची वाट बिकट आहे. खरं पाहिलं तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. असं असताना मुंबई इंडियन्सला प्रत्येक सामना अस्तित्वासाठी खेळायचा आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा आरसीबीशी लढत देणार आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवबाबत मोठी बातमी समोर आली आहे. (Photo: BCCI/IPL)

2 / 5
मागच्या सामन्यात हार्दिक पांड्या पाठीच्या दुखापतीमुळे खेळला नव्हता. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने नेतृत्व केलं होतं. असं असताना आरसीबी विरुद्ध खेळणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (Photo: BCCI/IPL)

3 / 5
रिपोर्टनुसार, सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 9 मे रोजी हार्दिक पांड्याची फिटनेस टेस्ट होणार आहे. या फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तर 10 मे रोजी आरसीबीविरुद्ध सामना खेळेल. अन्यथा खेळणं कठीण आहे. (Photo: BCCI/IPL)

4 / 5
हार्दिक पांड्या खेळेल की नाही हे सर्व फिटनेस टेस्टवर अवलंबून आहे. पण मुंबई इंडियन्सचा उपकर्णधार सूर्यकुमार यादवबाबत चांगली बातमी आहे. माहितीनुसार, सूर्यकुमार यादव या सामन्यासाठी रायपूरला जाणार आहे. (Photo: BCCI/IPL)

5 / 5
सूर्यकुमार यादवने मागच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर त्याच्या लक्ष्मीचं आगमन झालं. त्यामुळे कुटुंबासोबत असेल असं बोललं जात होतं. पण आता सामना खेळण्यासाठी सज्ज असल्याचं स्पष्ट झालं आहे. (Photo: BCCI/IPL)

Follow Us