
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एशेज सीरिजमधील चौथा आणि बॉक्सिंग डे टेस्ट मॅच परंपरेनुसार यंदाही 26 डिसेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी गोलंदाजानी कहर केला. गोलंदाजांनी या खेळपट्टीवर पहिल्याच दिवशी एकूण 20 विकेट्स घेतल्या. या दरम्यान इंग्लंडच्या एका गोलंदाजाने कमाल केली. (Photo Credit: PTI)

इंग्लंडने टॉस जिंकून कॅप्टन बेन स्टोक्स याचा निर्णय योग्य ठरवला. इंग्लंडने कांगारुंना 152 धावांवर गुंडाळलं. इंग्लंडसाठी जोश टंग याने सर्वाधिक 5 विकेट्स घेत कारनामा केला. जोशने 5 विकेट्स घेण्यासह अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली. (Photo Credit : Getty Images)

जोश टंग हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये गेल्या 27 वर्षांत इंग्लंडकडून 5 विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला. जोशआधी इंग्लंडच्या डॅरन गफ आणि डीन हेडली या दोघांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये अशी कामगरी केली होती. (Photo: Getty Images)

तसेच इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक यानेही कमाल केली. ब्रूकने 41 धावांसह कसोटीत 2 हजार रन्स पूर्ण केल्या. डकेटचा यासह कसोटीत किमान 2 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 86.85 इतका स्ट्राईक रेट झाला आहे. ब्रूकनंतर स्ट्राईक रेटबाबत इंग्लंडचा बेन डकेट दुसऱ्या स्थानी आहे. डकेटचा स्ट्राईक रेट हा 86.11 इतका आहे. (Photo: Getty Images)

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याने या सामन्यात राहुल द्रविड याला कॅच घेण्याबाबत मागे टाकलं. स्मिथ यासह सर्वाधिक कॅच घेणारा दुसरा खेळाडू ठरला. स्मिथने कसोटीत 212 कॅच घेतल्या आहेत. द्रविडच्या नावावर 210 कॅचेसची नोंद आहे. तर हा वर्ल्ड रेकॉर्ड इंग्लंडच्या जो रुट (214 कॅचेस) याच्या नावावर आहे. (Photo: Getty Images)

तसेच बॉक्सिंग डे टेस्टसाठी ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात स्टेडियममध्ये क्रिकेट चाहते उपस्थित असतात. यंदा चाहत्यांनी रेकॉर्ड ब्रेक केला. चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी एकूण 94 हजार 199 क्रिकेट चाहत्यांनी उरस्थिती लावली होती. यासह 2015 रेकॉर्ड ब्रेक झाला. एमसीजीमध्ये याआधी 2015 च्या वर्ल्ड कप फायनल सामन्याला 93 हजार 13 चाहत्यांनी उपस्थिती लावली होती. (Photo: Getty Images)