
आयपीएलचं 18वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी दहा संघांनी कंबर कसली आहे. पण असं असताना या स्पर्धेपूर्वीत दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने फ्रेंचायझींची धाकधूक वाढली आहे. त्यात लखनौ सुपर जायंट्सची गेल्या पर्वात सुरु झालेली चिंता यंदाही दूर होईल की नाही याबाबत साशंकता आहे. लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवला आयपीएल 2024 स्पर्धेत पाठदुखीचा त्रास झाला होता. त्यातून तो काही सावरलेला नाही.

आयपीएल 2024 स्पर्धा त्याला अर्धवट सोडावी लागली होती. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत दिसला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा दुखापत जाणवू लागल्याने त्याला बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकदामीत उपचारासाठी पाठवलं गेलं.

मयंक यादवच्या पाठदुखीचा त्रास काही कमी झालेला नाही. आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्या सत्रात खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, पहिल्या सात सामन्यात मयंक यादव खेळणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

आयपीएल 2025 स्पर्धा सुरु असताना एनसीएकडून त्याला फिटनेस सर्टीफिकेट मिळालं तर तो खेळू शकेल. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सला मयंक यादव रिटेन करून पश्चाताप करण्याची वेळ आहे. 11 कोटी रुपये मोजून त्याला कायम ठेवलं होतं. आता त्याच्याबाबत काही कन्फर्म नसल्याने बदली खेळाडूही घेता येत नाही.

लखनौ सुपरजायंट्स संघ: ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसिन खान, आयुष बडोनी, ऋषभ पंत, डेव्हिड मिलर, एडेन मार्कराम, मिचेल मार्श, अवेश खान, अब्दुल समद, आर्यन जुआल, आकाश दीप, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, दिग्वेश सिंग, शाहबाज अहमद, आकाश सिंग, शमर जोसेफ, प्रिन्स यादव, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगकर, अर्शीन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रेट्झक, मयंक यादव. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)