Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा दिलदारपणा, वर्ल्ड रेकॉर्ड कामगिरीनंतर अशी प्रतिक्रिया, काय म्हणाला?

Mitchell Starc World Record : ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज मिचेल स्टार्क याने गाबा कसोटीतील पहिल्या दिवशी आपल्या धारदार बॉलिंगने पाहुण्या इंग्लंडच्या 6 फलंदाजांना गार केलं. स्टार्कने यासह पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला.

Updated on: Dec 04, 2025 | 8:44 PM
1 / 5
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात प्रतिष्ठेची एशेस कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने स्पर्धेत विजयी सलामी दिली. तर आता यजमान ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीतही पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांच्याशिवाय खेळत आहे. मात्र त्यानंतरही मिचेल स्टार्क याने ऑस्ट्रेलियाला या दोघांनी उणीव जाणवू दिली नाही. स्टार्कने पर्थनंतर ब्रिस्बेनमध्येही अप्रतिम कामगिरी केली आहे. (Photo Credit : Getty Images)

2 / 5
एकट्या स्टार्कने ब्रिस्बेन कसोटीतील पहिल्याच दिवशी इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत पाठवला. स्टार्कने पहिल्याच ओव्हरमध्ये बेन डकेट याला आऊट केलं. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये ओली पोप याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पहिल्या दिवशी 9 झटके दिले. एकट्या  स्टार्कने त्यापैकी 6 विकेट्स घेतल्या. (Photo Credit : Getty Images)

3 / 5
स्टार्कने अशाप्रकारे सलग दुसऱ्या कसोटीतही 5 पेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी करुन दाखवली. स्टार्कने पर्थमधील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात 7 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच स्टार्कची डे नाईट टेस्टमध्ये पिंक बॉलने 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची सहावी आणि एकूण 18 वी वेळ ठरली. (Photo Credit : Getty Images)

4 / 5
स्टार्कने या कामगिरीसह पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. स्टार्क कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा डावखुरा गोलंदाज ठरला. स्टार्कने आतापर्यंत 102 कसोटींमध्ये 418 विकेट्स मिळवल्या आहेत. तर वसीम अक्रम याने 104 सामन्यांमध्ये 414 विकेट्स घेतल्या होत्या. (Photo Credit : Getty Images)

5 / 5
स्टार्कने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केल्यानंतर मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली. स्टार्कने स्वत:ला सर्वोत्तम गोलंदाज म्हणवण्यास नकार दिला. "वसीम अक्रम आताही जगातील सर्वोत्तम डावखुरे वेगवान गोलंदाज आहे. ते आजही माझ्यापेक्षा सरस आहेत", असं स्टार्कने म्हटलं. (Photo Credit : Getty Images)