Team India : सर्वाधिक एकदिवसीय सामने गमावणारे 5 भारतीय कर्णधार, धोनीचा कितवा नंबर?

Team India Odi Captains : टीम इंडियाला कोणत्या कॅप्टनच्या नेतृत्वात सर्वाधिक वनडे मॅचेसमध्ये पराभूत व्हावं लागलंय? सर्वात अपयशी एकदिवसीय कर्णधारांच्या यादीत महेंद्रसिंह धोनी कितव्या स्थानी आहे? जाणून घ्या.

| Updated on: Oct 13, 2025 | 8:42 PM
1 / 6
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातून दौऱ्यातून शुबमन पर्वाला सुरुवात होणार आहे. शुबमन ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून एकदिवसीय कर्णधार म्हणून सूत्र स्वीकारणार आहे. आतापर्यंत रोहित शर्मा भारताचं नेतृत्व करत होता. या निमित्ताने आपण सर्वाधिक एकदिवसीय सामने गमावणाऱ्या 5 भारतीय कर्णधारांबाबत जाणून घेऊयात.  (Photo Credit : PTI)

2 / 6
सर्वाधिक एकदिवसीय सामने गमावणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत मोहम्मद अझरुद्दीन पहिल्या स्थानी आहेत.  अझरुद्दीन यांनी भारताचं 174 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. त्यापैकी भारताने 90 सामने जिंकले. तर 76 वेळा पराभूत व्हावं लागलं होतं. (Photo Credit : AFP)

3 / 6
महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाच्या आघाडीच्या आणि यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने 200 पैकी 74 सामने गमावले. तर भारताने 110 सामने जिंकले होते. (Photo Credit : MI News/NurPhoto via Getty Images)

4 / 6
दादा अर्थात सौरव गांगुली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गांगुलीने भारताचं एकूण 146 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. त्यापैकी दादाने 76 सामने जिंकून दिले. तर 65 वेळा पराभूत व्हावं लागलं. (Photo Credit : PTI)

5 / 6
सचिन तेंडुलकर याने 73 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. भारताला सचिनने 23 सामन्यांमध्ये जिंकवलं. तर 43 वेळा पराभूत व्हावं लागलं होतं.  (Photo Credit: File/ICC)

6 / 6
दिग्गज आणि माजी कर्णधार कपिल देव या यादीत पाचव्या स्थानी आहेत. देव यांनी भारताचं 74  सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. देव यांनी त्यापैकी 39 सामन्यांमध्ये विजयी केलं. तर भारताला 33 वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. (Photo Credit : PTI)