
टीम इंडियाचा विराट कोहली 2025 या वर्षात वनडे क्रिकेटमधील किंग ठरला. विराट 2025 या वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय ठरला. विराटने या वर्षात 13 सामन्यांमध्ये 3 शतक आणि 4 अर्धशतकांसह एकूण 651 धावा केल्या. (Photo Credit : PTI)

रोहित शर्मा टीम इंडियासाठी 2025 वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. रोहितने 14 सामन्यांमध्ये 2 शतक आणि 4 अर्धशतकांसह 650 धावा केल्या. (Photo Credit : PTI)

मुंबईकर श्रेयस अय्यर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. श्रेयसने 11 सामन्यांमध्ये 5 अर्धशतकांसह 496 धावा केल्या. श्रेयसला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाली. त्यामुळे श्रेयसची आणखी काही सामने खेळण्याची संधी हुकली. (Photo Credit : PTI)

कॅप्टन शुबमन गिल चौथ्या स्थानी विराजमान आहे. शुबमने 11 सामन्यांमध्ये 2 शतक आणि 2 अर्धशतकांसह 490 धावा केल्या. श्रेयसप्रमाणे शुबमनलाही दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळता आलं नाही. (Photo Credit : PTI)

केएल राहुल या यादीत पाचव्या स्थानी आहे. केएलने 2025 मध्ये 14 सामन्यांमधील 11 डावात 367 धावा केल्या. केएलने त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकून दिली. (Photo Credit : PTI)