
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. नाणेफेकीचा कौल होताच मुंबई इंडियन्सच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. (Photo- Mumbai Indians)

मुंबई इंडियन्स आता टी२० फ्रँचायझी क्रिकेटमध्ये 300 सामने खेळणारा पहिला संघ ठरला आहे. टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तान आणि सॉमरसेटनंतर आपला 300वा टी20 सामना खेळणारा हा तिसरा संघ आहे. पाकिस्तानने 303 आणि सॉमरसेटने 303 सामने खेळले आहेत. (Photo- Mumbai Indians)

मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये एकूण 278 सामने खेळले आहेत. तर चॅम्पियन्स लीग टी20 मध्ये 22 सामने खेळले आहेत. या स्पर्धेतील साखळी फेरीत अजून 13 सामने मुंबई इंडियन्स खेळणार आहे. त्यामुळे ही संख्या 313 वर जाईल. अंतिम फेरी गाठली तर यात आणखी भर पडेल. (Photo- IPL/BCCI)

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मुंबई इंडियन्स सहाव्यांदा जेतेपदाचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरणार आहे. मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये जेतेपद मिळवलं होतं. (Photo- IPL/BCCI)

कोलकाता नाईट रायडर्सने 221 धावांचं आव्हान मुंबई इंडियन्सने 19.1 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. मुंबईने 14 वर्षानंतर आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच इतक्या मोठ धावसंख्येचा पाठलाग पहिल्यांदाच यशस्वीरित्या केल्या. (Photo- IPL/BCCI)