लीग आणि राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू संघाने बुधवारी (2 डिसेंबर) 24 ते 30 नोव्हेंबरदरम्यान 546 खेळाडूंची तपासणी केली होती. यात 48 म्हणजेच 9 टक्के खेळाडूंना कोरोना संसर्ग असल्याचं समोर आलं.
लीग आणि राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू संघाने बुधवारी (2 डिसेंबर) 24 ते 30 नोव्हेंबरदरम्यान 546 खेळाडूंची तपासणी केली होती. यात 48 म्हणजेच 9 टक्के खेळाडूंना कोरोना संसर्ग असल्याचं समोर आलं.
Follow us on
खेळावरही कोरोना विषाणू संसर्गाचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. अनेक खेळाडू आणि मालिकांवर याचा परिणाम झालाय. आयपीएल 13 च्या सुरुवातीलाच चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडून कोरोनाच्या विळख्यात सापडले.
नव्या सीझनच्या सुरुवातीला एनबीएनं म्हटलं आहे, की 48 खेळाडू मागील आठवड्याच्या कोरोना चाचणीत पॉझिटीव्ह आढळले आहेत.
लीग आणि राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू संघाने बुधवारी (2 डिसेंबर) 24 ते 30 नोव्हेंबरदरम्यान 546 खेळाडूंची तपासणी केली होती. यात 48 म्हणजेच 9 टक्के खेळाडूंना कोरोना संसर्ग असल्याचं समोर आलं.
कोरोना बाधित खेळाडूंना रिपोर्ट नेगेटिव्ह येईपर्यंत क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे. एनबीए आणि एनबीए प्लेयर असोसिएशनने आयसोलेशनमधून बाहेर येण्याची परवानगी दिल्यानंतरच ते लीगचा भाग होऊ शकणार आहेत.
लीगच्या अधिकाऱ्यांनी कोरोना बाधित खेळाडूंच्या नावांचा खुलासा केलेला नहाी. या वर्षी सुरुवातीलाच काही स्टार खेळाडूंना कोरोना संसर्ग झाल्यानंतर लीगचा संपूर्ण सीझन रद्द करण्यात आला होता.