
आशिया कप 2025 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून युएईत खेळवली जाणार आहे. पण या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाने एक डाव टाकला आहे. भारतीय संघासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. पाकिस्तान संघ आशिया कप स्पर्धेपूर्वी तिरंगी मालिका खेळणार आहे. ही स्पर्धा शारजाहमध्ये होणार असून यात युएई आणि अफगाणिस्तान संघ भाग घेणार आहेत.

पाकिस्तान-युएई आणि अफगाणिस्तान या तिरंगी मालिकेला 29 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे संघ भिडतील. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना 7 सप्टेंबरला होणार आहे.

आशिया कप स्पर्धेपूर्वीची रंगीत तालीम म्हणून या स्पर्धेकडे पाहीलं जात आहे. कारण या तिरंगी लढतीचा शेवटचा सामना 7 सप्टेंबरला होणार आहे. तर आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

तिरंगी मालिकेत तिन्ही संघांना साखळी फेरीत प्रत्येकी तीन सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. गुणांच्या आधारावर टॉपचे 2 संघ अंतिम फेरी गाठतील. या मालिकेत एकूण 6 सामने होणार आहेत.

भारतीय संघाने मागच्या पर्वात जेतेपदावर नाव कोरलं होतं. भारताने ही स्पर्धा सर्वाधिक आठवेळा जिंकली आहे. यंदा टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने टी20 फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होणार आहे. (सर्व फोटो टीव्ही 9 हिंदीवरून)