टेस्ट सामन्यात रवींद्र जडेजाची No Ball मुळे कसोटी, इतक्या वेळी हातातून गेली विकेट, जाणून घ्या

Ravindra Jadeja No Ball:अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्याकडून नो बॉलची चूक वारंवार घडत असल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. ओवरस्टेपिंगमुळे हातात आलेली विकेट गमवावी लागत आहे. अनेकदा यामुळे सामन्याचं चित्रही पालटून जातं. रवींद्र जडेजासोबत असं किती वेळा झालं? ते जाणून घ्या.

| Updated on: Aug 19, 2026 | 3:32 PM
1 / 5
गॉल कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने नो बॉलवर विकेट घेतली. त्यामुळे सर्व मेहनत पाण्यात गेली. श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डिसिल्वा याची विकेट मिळाली होती. पण ओवरस्टेपिंगमुळे हातातली विकेट गमावली आहे. रवींद्र जडेजासोबत असं पहिल्यांदाच घडलं असं नाही. यापूर्वीही त्याने अशी चूक केली आहे.  (Photo: PTI)

2 / 5
2015 भारत दक्षिण अफ्रिका कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने नो बॉल टाकल्याने एबी डिव्हिलियर्सची विकेट गेली होती. 2017 मध्ये नागपूर कसोटीत  तीच चूक पुन्हा केली होती. तेव्हा दिमुथ करुणारत्नेची विकेट ओवरस्टेपिंगमुळे गमावली.  याच वर्षी दिल्ली कसोटीत श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूज आणि दिनेश चंडीमलची विकेट मिळाली नव्हती.  (Photo: PTI)

3 / 5
वेस्ट इंडिजविरुद्ध 2019 मध्ये किग्स्टन कसोटीत एक पाय क्रिझ लाईनच्या बाहेर पडल्याने शमारा ब्रूक्सची विकेट मिळाली नव्हती. 2020 मध्ये क्राइस्टचर्च कसोटीत न्यूझीलंडचा फलंदाज हेन्री निकल्सची विकेटसोबत असंच झालं होतं. तेव्हाही ओवरस्टेपिंगमुळे विकेट मिळाली नव्हती.  (Photo: PTI)

4 / 5
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2023 कसोटी मालिकेत रवींद्र जडेजाने अशीच चूक केली होती. त्यामुळे तीन विकेट हातच्या गेल्या होत्या. यात नागपूर कसोटीत स्टीव्ह स्मिथची विकेट गेली होती. ही त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील 250 विकेट असती. इंदुरमध्ये मार्नस लाबुशेन आणि दिल्ली कसोटीत पीटर हँड्सकॉम्बची विकेट नो बॉलमुळे मिळाली नव्हती.  (Photo: PTI)

5 / 5
मागच्या पाच वर्षांची आकडेवारी काढली तर रवींद्र जडेजा सर्वाधिक नो बॉल टाकणारा फिरकीपटू आहे. त्याने 2021 पासून आतापर्यंत 84 नो बॉल टाकले. या दरम्यान पाकिस्तानचा नोमान अली 40 नो बॉलसह दुसऱ्या स्थानावर आहे.  (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us