IPL Playoffs : प्लेऑफ्समध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, शुबमन-विराट कितव्या स्थानी?
Most Runs In IPL Playoffs : आयपीएल 2026 स्पर्धेत 26 मे पासून प्लेऑफचा थरार रंगणार आहे. क्वालिफायर 1 सामन्यात आरसीबी विरुद्ध गुजरात आमनेसामने असणार आहे. या निमित्ताने जाणून घ्या प्लेऑफ्समध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांबाबत.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात प्लेऑफ्समध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा मिस्टर आयपीएल सुरेश रैना याच्या नावावर आहे. रैनाने 37.57 च्या सरासरीने 714 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Getty Images)

रैनानंतर चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या स्थानी आहे. महेंद्रसिंह धोनी याने 34.86 च्या सरासरीने 523 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

गुजरात टायटन्सचा कर्णधार आणि स्टार फलंदाज शुबमन गिल याने आयपीएल कारकीर्दीत प्लेऑफ्समध्ये 475 धावा केल्या आहेत. गिल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Photo Credit : PTI)

गिलनंतर सूर्यकुमार यादव या यादीत चौथ्या स्थानी आहे. मिस्टर 360 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्याने प्लेऑफ्समध्ये 406 रन्स केल्या आहेत. (Photo Credit : PTI)

हिटमॅन रोहित शर्मा पाचव्या स्थानी आहे. रोहितने 405 धावा केल्या आहेत. तर विराट कोहली 396 धावांसह सहाव्या क्रमांकावर आहे. (Photo Credit : PTI)