IPL : आयपीएल स्पर्धेत शेवटच्या चेंडूवर सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, मुंबई कितव्या स्थानी?
IPL : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रविवारी 11 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध शेवटच्या चेंडूवर 2 धावा करुन सामना जिंकला. या निमित्ताने स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शेवटच्या चेंडूवर सामना जिंकणाऱ्या संघांबाबत जाणून घेऊयात.

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक 9 सामने शेवटच्या चेंडूवर जिंकले आहेत. सीएसकेने पहिल्याच मोसमात (2008) पहिल्यांदा शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला होता. त्यानंतर सीएसकेने 2012 साली 3 वेळा शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. तर 2019, 2020, 2021, 2022 आणि 2023 साली चेन्नईने शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे. ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने चेन्नईला 3 वेळा शेवटच्या चेंडूवर विजयी केलं आहे. (Photo Credit : PTI)

मुंबई इंडियन्सने एकूण 7 वेळा शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आहे. मुंबईने 2011 आणि 2012 साली प्रत्येकी 2 वेळा शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आहे. तसेच मुंबईने 2019, 2021 आणि 2023 साली पलटणने प्रत्येकी 1 सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला आहे. (Photo Credit : PTI)

राजस्थान रॉयल्सने 5 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे. राजस्थानने 2008 आणि 2015 साली प्रत्येकी 2 वेळा शेवटच्या चेंडूवर विजय मिळवलाय. तर राजस्थानने 2024 साली शेवटच्या बॉलवर सामना जिंकला आहे. (Photo Credit : PTI)

जीटी आणि आरसीबी या दोन्ही संघांनी प्रत्येकी 4-4 वेळा शेवटच्या चेंडूवर सामना जिंकण्याची कामगिरी करुन दाखवली आहे. गुजरातने 2022 साली 2 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे. त्यानंतर 2024 आणि 2025 साली शेवटच्या बॉलवर सामना जिंकला आहे. (Photo Credit : PTI)

पंजाब किंग्सने 4 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे. केकेआरने 3 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे. केकेआरने 3, रायजिंग पुणे सुपरजायंट्स, सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्सने प्रत्येकी 2 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवलाय. तर डेक्कन चार्जर्सने एकदा शेवटच्या बॉलवर सामना जिंकला आहे. (Photo Credit : PTI)