IPL 2026 : वैभव सूर्यवंशी-अर्जुन तेंडुलकर यांच्या सॅलरीत 80 लाख रुपयांचा फरक, सर्वाधिक रक्कम कुणाला?

Vaibhav Suryavanshi vs Arjun Tendulkar IPL 2026 Salary : वैभव सूर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकर या दोघांच्या आयपीएल सॅलरीत तब्बल 80 लाख रुपयांचा फरक आहे. जाणून घ्या दोघांपैकी 19 व्या हंगामात सर्वाधिक रक्कम कुणाला मिळणार?

| Updated on: Dec 05, 2025 | 4:29 PM
1 / 5
वैभव सूर्यवंशी आणि अर्जून तेंडुलकर हे भारताचे 2 युवा स्टार खेळाडू कायमच चर्चेत असतात.  वैभव अंडर 19 टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करत आहे. तर अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा टीमकडून खेळत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत गोवा विरुद्ध बिहार आमनेसामने आले होते. या सामन्यात वैभव विरुद्ध अर्जून यांच्यात 10 चेंडूंचा सामना झाला. (Photo Credit : PTI)

2 / 5
गोव्याने या सामन्यात बिहारवर मात केली. मात्र वैभवने या सामन्यातही उल्लेखनीय कामगिरी केली. वैभवने या सामन्यात 25 बॉलमध्ये 46 रन्स केल्या होत्या. तर अर्जुनने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 32 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. मात्र अर्जुनला बॅटिंगने काही खास करता आलं नाही. अर्जुनला 5 धावाच करता आल्या. (Photo Credit : PTI)

3 / 5
वैभव आणि अर्जुन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेनंतर आयपीएलमध्ये आमनेसामने येऊ शकतात. वैभव आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व करत आहे. तर अर्जुन 19 व्या मोसमात लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. लखनौने अर्जुनला मुंबईकडून ट्रेडद्वारे घेतलं आहे. वैभव आणि अर्जुन या दोघांच्या आयपीएल सॅलरीमध्ये किती अंतर आहे? हे जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

4 / 5
वैभवने 18 व्या मोसमातून (IPL 2025) राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल पदार्पण केलं. राजस्थानने आगामी मोसमासाठी वैभवला रिटेन केलं आहे. राजस्थानने वैभवसाठी 1 कोटी 10 लाख रुपये मोजले.  त्यामुळे वैभवला यंदाही तेवढीच रक्कम मिळणार आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
तसेच मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकर याला  18 व्या हंगामासाठी 30 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलेलं. तर लखनौने अर्जुनला त्याच भावात ट्रेडद्वारे घेतलं. त्यामुळे अर्जुनला 19 व्या हंगामातही तेवढीच रक्कम मिळणार आहे. (Photo Credit : PTI)