
आयपीएल 2026 स्पर्धेची तयारीसाठी फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. मात्र गुजरात टायटन्सच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. त्याला कारणही तसंच आहे. युवा आणि सलामीचा फलंदाज साई सुदर्शनला विजय हजारे ट्रॉफीत दुखापत झाली आहे. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

दुखापत झाल्यानंतर साई सुदर्शन उर्वरित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यातून आऊट झाला आहे. सध्या तो बेंगळुरू येथील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे उपचार घेत आहे. पण, दुखापत गंभीर नसल्याबद्दल संघाला दिलासा मिळाला आहे. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

साई सुदर्शन आयपीएल 2026 मध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीसह मैदानात परतू शकतो. मध्य प्रदेशविरुद्ध 51 धावांच्या खेळीदरम्यान तामिळनाडूच्या साई सुदर्शनला दुखापत झाली.साई सुदर्शन कर्नाटक आणि झारखंड विरुद्धच्या सामन्यांमध्ये सहभागी झाला नाही. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

24 वर्षीय सुदर्शनला यापूर्वी नेटमध्ये चेंडू लागल्याने सौम्य वेदना होत होत्या. परंतु त्याला फार काही वाटले नव्हते. पण रन घेताना त्याने मारलेल्या डायव्हमुळे त्याला दुखापत झाली. सीटी स्कॅनमध्ये त्याच्या उजव्या बाजूच्या सातव्या बरगडीला हलकं फ्रॅक्चर आढळले. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)

सुदर्शन सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांना आणि कदाचित रणजी ट्रॉफी 2025-26 च्या दुसऱ्या टप्प्याला मुकू शकेल. पण आयपीएल 2026 मध्ये खेळण्यास तयार असेल. कारण त्याला झालेली दुखापत दोन महिन्यांच्या आतच बरी होईल. (फोटो- बीसीसीआय/आयपीएल)