रोहित शर्मानंतर आता सूर्यकुमार यादवची पाळी! कर्णधारपदावर टांगती तलवार, झालं असं की…

टी20, कसोटीनंतर आता रोहित शर्माचं वनडेमधील कर्णधारपदाचं पर्व संपलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वनडे संघाची घोषण केली. संघात रोहित शर्माही आहे. पण कर्णधारपद शुबमन गिलकडे देण्यात आलं आहे. दुसरीकडे, टी20 संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे आहे. आता त्यावरही टांगती तलवार आहे.

| Updated on: Oct 05, 2025 | 5:47 PM
1 / 5
भारतीय क्रिकेटमध्ये आता शुबमन पर्व सुरु झालं आहे. इंग्लंड दौऱ्यात शुबमन गिलकडे कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली होती. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माकडून वनडे संघाचं कर्णधारपद काढून शुबमन गिलकडे सोपण्यात आलं आहे.

2 / 5
शुबमन गिल आता कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार असणार आहे. तर यापूर्वी दोन्ही संघांची धुरा रोहित शर्माकडे होते. कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्याने शुबमन गिलकडे जबाबदारी आली. दुसरीकडे, रोहित शर्मा वनडे संघात असूनही ही जबाबदारी शुबमन गिलकडे दिली आहे. तर टी20 संघाची धुरा मिळवण्यासाठी मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

3 / 5
सूर्यकुमार यादव टी20 वर्ल्डकप 2026 पर्यंत भारतीय टी20  संघाचा कर्णधार असणार आहे. त्यानंतर कर्णधारपद शुबमन गिलकडे सोपवलं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार तयारी सुरु असल्याचं आशिया कप स्पर्धेत दिसून आलं आहे. शुबमन गिलला टी20 संघात स्थान मिळालं आणि उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.

4 / 5
बीसीसीआयने तिन्ही फॉर्मेटसाठी एकच कर्णधार निवडण्याचा निर्णय घेतला आहे. वनडे वर्ल्डकप संघाची घोषणा करताना अजित आगरकर यांनी तसे संकेतही दिले आहेत. तिन्ही फॉर्मेटमध्ये एकच कर्णधार असेल तर संवाद साधणं सोपं होतं असं त्यांचं म्हणणं आहे.

5 / 5
शुबमन गिलला टी20 संघांचं कर्णधार भूषवण्यासाठछी मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. टी20 वर्ल्डकप 2026 फेब्रुवारी मार्चमध्ये होणार आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर शुबमन गिलकडे धुरा सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.   (सर्व फोटो- टीव्ही नेटवर्क/ कन्नड)