मालिकेतील शेवटची संधी! टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादव 12वा खेळाडू ठरणार

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना होत आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवकडे शेवटची संधी आहे. सूर्यकुमार यादव 12वा खेळाडू ठरण्याची दाट शक्यता आहे. कसं काय ते समजून घ्या

| Updated on: Jan 31, 2026 | 4:54 PM
1 / 5
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा टी20 सामना तिरुवनंतपुरम येथे होत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उतरण्यापूर्वी तयारीसाठी भारताचा हा शेवटचा सामना असणार आहे. इतकंच काय तर सूर्यकुमार यादवला 12वा खेळाडू होण्याची शेवटी संधी आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
वर्ल्ड क्रिकेटमध्ये आतापर्यंत 11 खेळाडूंनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहे. सूर्यकुमार या यादीत सहभागी होणारा 12वा खेळाडू ठरू शकतो. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
सूर्यकुमार यादव 103 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यात त्याने 97 डावात 2967 धावा केल्या आहेत. त्याला आता 3 हजारांचा टप्पा गाठण्यासाठी 33 धावांची गरज आहे. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरूद्ध 33 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या तर 3 हजार धावा करणारा 12वा खेळाडू ठरेल. पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या स्थानावर असून त्याने 130 डावात 4453 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने 151 डावात 4231 धावा, विराट कोहलीने 117 डावात 4188 धावा केल्यात. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
भारताने न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्याची टी20 मालिका 3-1 ने जिंकली आहे. चौथ्या सामन्यात भारताचा 50 धावांनी पराभव झाला होता. त्यामुळे पाचव्या सामन्यात कमबॅकसाठी टीम इंडियाला प्रयत्न करावा लागणार आहे. (Photo- BCCI Twitter)