Suryakumar Yadav चा झंझावात, वादळी अर्धशतकासह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, कॅप्टनचा वर्ल्ड कपआधी धमाका

Suryakumar Yadav World Record : सूर्यकुमार यादव याने तिरुवनंतपुरममध्ये न्यूझीलंड विरुद्ध विध्वंसक खेळी केली. सूर्याने या खेळीदरम्यान ऐतिहासिक कामगिरी करत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

| Updated on: Jan 31, 2026 | 9:26 PM
1 / 5
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने न्यूझीलंड विरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात धमाका केला आहे.  सूर्याने तिरुवनंतरपुरममधील ग्रीन फिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये वादळी खेळीसह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (Photo Credit : Bcci)

2 / 5
सूर्याने न्यूझीलंड विरुद्ध 30 बॉलमध्ये 210 च्या स्ट्राईक रेटने 63 धावांची वादळी खेळी केली. सूर्याने या खेळीत 6 सिक्स आणि 4 फोर लगावले. (Photo Credit : Bcci)

3 / 5
सूर्याने 14 व्या षटकारदरम्यान 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याने या अर्धशतकी खेळी दरम्यान वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. सूर्या टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान 3 हजार धावा पूर्ण करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला.  (Photo Credit : Bcci)

4 / 5
सूर्याने अवघ्या 1 हजार 822 चेंडूत 3 हजार टी 20i धावा पूर्ण केल्या. सूर्याने यासह यूएईचा अनुभवी फलंदाज मुहम्मद वसीम याचा रेकॉर्ड ब्रेक केला. वसीमने 1 हजार 947 चेंडूत 3 हजार टी 20i धावा करण्याची कामगिरी केली होती.  (Photo Credit : Bcci)

5 / 5
तसेच सूर्याने 3 हजार धावा पूर्ण करण्यासह आणखी एक खास कामगिरी केली. सूर्या टीम इंडियाकडून 3 हजार टी 20i धावा करणारा एकूण तिसरा तर पहिला सक्रीय फलंदाज ठरलाय. सूर्याआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी अशी कामगिरी केली होती. (Photo Credit : @surya_14kumar X Account)