T20 WC 2026: शिवम दुबेची षटकारांची खेळी, युवराज सिंग-हार्दिक पांड्या यांना टाकलं मागे
India vs Netherlands: शिवम दुबेने नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात 66 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सहा षटकार मारले. यासह एका विक्रमाची नोंद केली आहे.

नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने आत्मपरीक्षण केलं. नाणेफेकीचा कौल जिंकूनही प्रथम फलंदाजी स्वीकारली. दव फॅक्टरचं कारण असूनही सूर्यकुमारने मोठा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. पण मधल्या फळीत शिवम दुबेने डाव सावरला. (Photo: PTI)

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाचव्या किंवा त्यापेक्षा खाली फलंदाजी करताना मोठी खेळी करणार फलंदाज ठरला आहे. शिवम दुबेने नेदरलँडविरुद्ध 66 धावांची खेळी केली. यावेळी त्याने हार्दिक पांड्याचा विक्रम मोडला. त्याने 2022 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 63 धावांची खेळी केली होती. युवराज सिंगने 2007 मध्ये 58 धावा केल्या होत्या. (Photo: PTI)

शिवम दुबे टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या एका सामन्यात सहा किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. भारतासाठी टी20 वर्ल्डकपच्या एका सामन्यात 8 षटकारांचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. तर युवराज सिंगने 2007 मध्ये 7 षटकार मारले होते. (Photo: PTI)

शिवम दुबेने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 15 षटकार मारले आहेत. महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड मोडण्यापासून दोन षटकार दूर आहे. त्याने टी20 वर्ल्डकप करिअरमध्ये 16 षटकार मारले आहेत. रोहित शर्माच्या नावावर 50 षटकार आहेत. (Photo: PTI)

शिवम दुबेची ही खेळी खूपच खास राहिली . त्याने पहिल्यांदा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 50हून अधिक धावा केल्या. शिवम दुबेने पाकिस्तानविरुद्धही चांगली कामगिरी केली होती. (Photo: PTI)