
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी सुमार राहिली. भारताला आपली 20 षटकं पूर्ण खेळता आली नाही. भारतीय संघाने 19 षटकात सर्वबाद 119 धावा केल्या आणि 120 धावांचं आव्हान दिलं.

भारतीय संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच ऑलआऊट झाला आहे. यापूर्वीच्या 8 पर्वात असं कधीच घडलं नव्हतं. मात्र रोहित सेनेवर ही नामुष्की ओढावली आहे. यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ कधीच ऑलआऊट झाला नव्हता.

पाकिस्तानविरुद्ध भारताने टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वात कमी स्कोअर केला आहे. 2016 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 79 धावांवर ऑलआऊट झाला होता. आता पाकिस्तानविरुद्ध 119 धावांवर ऑलआऊट झाला आहे.

भारतीय संघाने पहिल्या 10 षटकात 3 गडी बाद 81 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर 9 षटकात फक्त 38 धावा केल्या आणि 7 गडी गमावल्या.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.